शेतीला पूरक जोड व्यवसाय असणारा दूध – उत्पादन व्यवसाय, ज्याद्वारे आपण दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीतून कमाई करतो. शिवाय शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या शेणखताची सोय करतो. हा व्यवसाय कमी खर्चात, कमी कष्टात कसा फायदेशीर करता येईल? याबाबतचे गोठा व्यवस्थापन आणि पशूसंगोपनाचे परिपूर्ण प्रशिक्षण आपण डेअरी क्लबमार्फत घेणार आहोत.